शिवसेना-भाजपमधली जागावाटपाची चर्चा खोळंबली

September 14, 2014 6:54 PM4 commentsViews: 2598

udhav-thakare_and_modi copy

14 सप्टेंबर :  शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील जागा वाटपाचा तिढा सुटण्याऐवजी अधिकच गुंतागुंतीचा होत आहे. शिवसेनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर वारंवार होणार्‍या टीकेमुळे भाजपमध्ये नाराजी आहे. त्यामुळे जागावाटपाची बोलणी सध्या थांबली असल्याचं भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शिवसेनेला समजुतदारीनं वागण्याचा सल्ला दिला आहे. या पार्श्वभूमीवर राजीव प्रताप रुडी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज होणारी भेट आता उद्यावर गेली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितला आहे. सामनामधून उद्धव ठाकरेंच्या भूमिकेला पाठिंबा देण्यात आला होता. शिवसेनेच्या या दाव्यामुळे भाजप गोटात अस्वस्थतेचे वातावरण आहे. शिवसेनेच्या या दाव्याला उत्तर देताना ज्यांचे आमदार जास्त, त्यांचा मुख्यमंत्री असं विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू व्हायला जेमतेम आठवड्याचा कालावधी उरला असतानाही शिवसेना-भाजपमधलं जागावाटपाचं गुर्‍हाळ अजूनही सुरूच आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Sham Dhumal

  मुख्यमंत्री शिव सेनेचाच अशी घोषणा करुन शिवसेनेने आपल्याच पायावर दगड मारला आहे. कारण त्यामुळे युती तुटणार आणि सेनेचेच नुकसान होणार आहे.

 • Sham Dhumal

  बी.जे.पी.साठी जनमत वाढले आहे त्यामुळे त्यांनी किमान १४० जागा तरी मागायला पाहीजेत. बी.जे.पी.च्या (मोदींच्या) नावामुळे सिवसेनेचे बरेचसे खासदार निवडुन आले आहेत हे विसरून चालणार नाही.

 • Santosh

  are tya uddhav la kahi kalta ka? modi mule 18 khasdaar nivdun ale, nahi tar tyachi waat lawli asti raj ne.

 • Rangnath Pawar

  शिवसेना विसार्तीया कि स्वर्गीय बाळासाहेब असताना शिवसेनेने १७१ जागा लाडवून ४४ जागा निवडून येतात अन बी जे पी ११७ जागा लाडवून ४६ जागा निवडून येतात मोदीची लाट नसताना तर आपापली किती कुवत आहे हे माहित असताना उगीच ताना तानी करू नये आत्ता तरी समसमान जागा लढवाय पाहिजे नाहीतर कोल्हा कुत्रांची भारती कराल हे लक्षत घा

close