तेंडुलकरांच्या स्मृतीदिनी ‘अडलंय माझं थेटर’चा प्रयोग

May 19, 2009 3:20 PM0 commentsViews: 4

19 मे, अजय परचुरे विजय तेंडुलकर यांचा पहिला स्मृतीदिन. तेंडुलकरांची आठवण म्हणून आविष्कार नाट्यसंस्था नारद रागावलाय अर्थात 'अडलंय माझं थेटर' हे नाटक मुंबईत सादर करणार आहे. या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे 25 युवा कलाकार एकत्र येऊन हे भन्नाट नाट्य सादर करणार आहेत. 25 युवा कलाकारांची ही फौज 'अडलंय माझं थेटर' या आपल्या नाटकाच्या रिहर्सलवर बरीच मेहनत घेत आहेत. आविष्कारची ही युवा ब्रिगेड विजय तेंडुलकरांच्या आठवणी जागवण्यासाठी हे भन्नाट नाट्य साकारणार आहे. या नाटकातली तरूण मुलं तेंडुलकरांच्या लिखाणाची जबरदस्त फॅन आहेत. त्यामुळे तेंडुलकरांच्या स्मृतीदिनी नाटक करायला मिळणं हीच त्यांच्यासाठी मोठी गोष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तेंडुलकरांनी नेहमीच तरूण रंगकर्मीना प्रोत्साहित केलं. त्यामुळेच कदाचित त्यांची आठवण होता होता या मुलांना आणि प्रत्येक रंगकर्मीला हेच वाटत असेल, तेंडुलकर तुमच्याशिवाय खरोखरच अडलंय माझं थेटर .

close