वाघांमुळे पर्यटक ‘ताडोबा’कडे आकर्षित

September 15, 2014 8:32 AM0 commentsViews: 761

Tadoba forest

15 सप्टेंबर :  चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात राज्यात सर्वाधिक वाघ असल्याने पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहे. विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात ताडोबाला भेट देत आहेत. ताडोबाला आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या स्पर्धेत ओळख मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने प्रयत्न सुरू केला आहे. याचाच एक भाग म्हणजे गेले तीन दिवस अमेरिका, जर्मनी, झेकोस्लोवाकिया, इटली, फ्रान्स या पाच देशांतील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे 21 टूर ऑपरेटर्स आणि ट्रॅव्हल्स एजंट ताडोबात मुक्कामाला होते.

वाघांच्या सायटिंग छायाचित्रांबरोबर निसर्गातील घनदाट अरण्य आणि वन्यजीवांची आश्रयस्थळे याची त्यांनी माहिती घेतली असून त्याचा उपयोग विदेशी पर्यटकांसाठी खास पॅकेज तयार करून आंतरराष्ट्रीय सहलीचे आयोजन करण्यात येणार आहे. यामुळे येणार्‍या काळात ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नवी ओळख मिळणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close