भारतीय विद्यार्थ्यांसाठी यूएस युनिव्हर्सिटी फेअर

September 15, 2014 12:31 PM0 commentsViews: 222

15 सप्टेंबर :   भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेता यावं म्हणून पुण्यात पहिल्यांदाच यूएस युनिव्हर्सिटी फेअरच आयोजन करण्यात आलं होतं. या फेयरमध्ये अमेरिकेतील जवळपास 30 विद्यापीठ सहभागी झाली होती. भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकेतल्या विद्यापीठात प्रवेश घेतांना अनेक अडचणीना तोंड द्यावा लागतो, मात्र या फेयरमध्ये यूएस विद्यापीठातल्या अधिकार्‍यांनी आणि 50 माजी विद्यार्थ्यांनी, भारतातल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. यू एसच्या युनिर्वसीटी मध्ये विद्यार्थ्यांना कशा प्रकारे प्रवेश मिळू शकतो. प्रवेशा करताना त्यांना कुठे आणि कशा प्रकारे अर्ज कारावा लागेल, अशा विविध विषयाची माहिती या फेयर मध्ये विद्यार्थ्यांना देण्यात आली. विद्यार्थ्यांनीही या फेयरला मोठा प्रतिसाद दिला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close