दिल्लीत सोनिया गांधींच्या निवासस्थानी यूपीएची बैठक

May 20, 2009 7:06 AM0 commentsViews: 1

20 मे, युपीएच्या महत्वपूर्ण बैठकीला सोनिया गांधींच्या निवासस्थानी सुरूवात झाली आहे. या बैठकीत नव्या मंत्रिमंडळाच्या स्वरूपाविषयी चर्चा होऊन अंतिम निर्णय घेण्यात येईल. या बैठकीला शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती आहे. त्यातच बसपा आणि सपा यांच्या बिनशर्त पाठिंबा देण्याच्या निर्णयानंतर युपीएच संख्यांबळ आता 321 पर्यंत पोहचलंय. मात्र बसपा आणि सपा यांचा पाठिंबा घ्यायचा की, नाही याचा निर्णय सोनिया गांधींच घेतील. 22 मे ला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. काँग्रेस संसदीय पक्षाच्या 19 मे रोजी झालेल्या बैठकीत मनमोहनसिंग यांची नेतेपदी तर सोनिया गांधी यांची चेअरपर्सन म्हणून निवड करण्यात आली. दरम्यान पंतप्रधान मनमोहन सिंग आता युपीएच्यावतीने सरकार स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे.

close