उद्धव यांनी भाजपची मागणी फेटाळली

September 15, 2014 2:11 PM0 commentsViews: 2657

fadanvis_udhav_thackarey15 सप्टेंबर : भाजपची 135 जागेची मागणी शक्य नाही, पण युती तुटेल असं कोणतंही पाऊल उचलणार नाही असा थेट इशाराच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलाय. युतीही हिंदुत्वाच्या मुद्यावर आधारलेली आहे. त्यामुळे जोपर्यंत युतीचा फैसला होत नाही तोपर्यंत काहीही बोलणार नाही असा पवित्रा उद्धव यांनी घेतलाय.

विधानसभेचे बिगुल वाजले असून प्रचाराची लगबग सुरू झाली आहे मात्र महायुतीत जागावाटपाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. रविवारी पुण्यात भाजपचे महाराष्ट्र प्रभारी राजीव प्रताप रूडी यांनी 135 जागेची मागणी केली होती.

त्यानंतर आज मुंबईत भाजपच्या नेत्यांनी ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी जागावाटपाचा आपला फार्म्युला ठाकरेयांच्या समोर मांडला होता. पण रुडी या बैठकीला उपस्थित नव्हते. त्यानंतर उद्धव यांनी पत्रकार परिषद घेऊन 135 जागांची मागणी अमान्य असल्याचं सांगितलं.
135 जागा देणे हे शक्य नाही मी माझी भूमिका भाजपला सांगितली आहे. पण युती तुटणार नाही असं कोणतही पाऊल मी उचलणार नाही. आमची हिंदुत्वाचा आधारावर ही युती झाली आहे त्यामुळे जोपर्यंत युतीचा फैसला होत नाही त्यावर नकारात्मक काहीही बोलणार नाही असं उद्धव यांनी स्पष्ट केलं. तसंच माधव भांडारी काय बोलले त्यावर मला काहीही बोलायचं नाही असंही उद्धव म्हणाले. दरम्यान, 2 दिवसांमध्ये महायुतीचा निर्णय झाला नाही, तर जनतेच्या हृदयात असलेल्या आमच्या स्थानाला धक्का बसू शकतो, असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close