हिंद केसरी रोहित पटेलने जिंकली ‘कुंडल कुस्ती’ स्पर्धा

September 15, 2014 9:27 PM0 commentsViews: 254

rohit patel15 सप्टेंबर : सांगली जिल्ह्यातील कुंडलमधील कुस्ती स्पर्धा प्रतिष्ठेची मानली जाते. यावर्षीची ही स्पर्धा हिंद केसरी रोहित पटेल यानं जिंकलीय.कुंडल येथील ऐतिहासिक महाराष्ट्र कुस्ती मैदानात हिंद केसरी रोहित पटेल याने हिंद केसरी हितेश कुमार यास धोबीपछाड डावावर चीतपट करून, प्रथम क्रमांकाचे पाच लाख रुपयांचे बक्षीस पटकावले आहे.

रोहित पटेल याने अत्यंत चपळाईने कामगिरी करीत हितेश कुमारवर विजय मिळवला. लाखो प्रेक्षकांच्या नजरा कुस्तीकडे खिळून राहिल्या होत्या. गेल्या 95 वर्षांपासून सांगली जिल्ह्यातील कुंडलमध्ये लाल मातीतील कुस्त्या भरवल्या जातात. द्वितीय क्रमाकांच्या लढतीत पंजाबचा हिंदी केसरी कृष्णकुमार याने हिंदकेसरी परवेश घुटना डावावर चीतपट केले.

हिंदी केसरी कृष्णकुमार याने चार लाख रुपयांचे पारितोषिक मिळवले. तर तृतीय क्रमांकाची महाराष्ट्राचा विजय चौधरी याने सुनील साळुंखे याला चीतपट केले.विजय चौधरी याने दोन लाख रुपयांचे पारितोषिक मिळवले.कुंडलच्या मैदानासाठी नामवंत मल्ल आणि क्रीडा शौकीन उपस्थित असतात. आत्तापर्यंत या मैदानात कै.हरिश्चंद्र बिरासदार, कै.हिंदकेसरी मारुती माने, गणपतराव आंधळकर, दिनानातशिंह, दिनकर दह्यारी या सारख्या देशातील नामांकित मल्लांनी आपल्या कुस्तीचे दर्शन घडवले आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close