साहित्य संमेलनाच्या निवडणूक प्रक्रियेत गोंधळ

September 16, 2014 8:26 AM0 commentsViews: 262

 

Sahitya samelan16 सप्टेंबर : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होताच नव्या गोंधळ आणि वादाला सुरुवात झाली आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी मतदार याद्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत. पण या याद्यांमधून मतदारांचे मोबईल नंबर आणि ईमेल आयडी वगळण्यात आले आहेत.

पंजाबमधल्या घुमान इथे होणार्‍या 88 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज डॉ.सदानंद मोरे यांनी उमेदवारी अर्ज सादर केला आहे. संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला आता सुरुवात झाली आहे. त्यासाठी काल पहिला अर्ज सादर करण्यात आला.

मतदारांची संख्या आहे 1170. त्यामुळे इतक्या मतदारांशी संपर्क कसा साधायचा असा प्रश्न विचारत साहित्यिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर आमचे उमेदवार सूज्ञ आहेत, त्यामुळे त्यांना सतत फोन आणि ईमेल पाठवण्याची आवश्यकता नसल्याचे महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप)ने सांगितलं आहे. दरम्यान, उपलब्ध माहितीच्या आधारेच मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू, अशी भूमिका सदानंद मोरे यांनी घेतली आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close