जम्मू -काश्मीर नॅशनल हायवे13 दिवसांनंतर पुन्हा सुरू

September 16, 2014 10:58 AM0 commentsViews: 617

india-floods-poonch-river

16 सप्टेंबर :  जम्मू -काश्मीर नॅशनल हायवे आज (मंगळवारी) सकाळी 13 दिवसांनंतर पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

 काश्मीर खोर्‍यात अनेक ठिकाणी आलेल्या महापूरामुळे गुंगरू आणि हिंगणीच्या दरम्यान हा हायवे खचला होता. काश्मीर खोर्‍याला जोडणारा हा एकमेव मार्ग असल्याने, महामार्ग सुरू करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू होते. जम्मू -काश्मीर नॅशनल हायवे ऑथोरिटीनं दरड हटविण्याचे काम केले आणि रस्ता पुन्हा सुरू केला.

महामार्ग पुन्हा सुरू झाल्याने पुरग्रस्त भागात मदत पोचविण्यास फायदा होणार आहे. आज सकाळपासून या हायवेवरून एका बाजूची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. जम्मूच्या बाजूनं काश्मीरकडे जाणार्‍या वाहतुकीला प्राधान्य दिलं जातं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close