‘ज्यूस प्या आणि बरे व्हा!’, ज्यूस पाजून भक्तांना बरं करण्याचा दौंडमधल्या नितीनबाबांचा दावा

September 16, 2014 1:12 PM1 commentViews: 10239

tomato baba

16 सप्टेंबर :  ‘कोणताही आजार असो, टोमॅटो ज्यूस प्या आणि बरे व्हा!’… टोमॅटो ज्यूस पाजून भक्तांचा आजार बरा करण्याचा दौंडमधल्या नितीनबाबांनी दावा केला आहे. त्यांचा हा ‘तीर्थप्रसाद’ पिण्यासाठी या गावात आठवड्यातून 2 दिवस जत्रा भरते. आश्चर्य म्हणजे यात बाबांच्या अंधश्रद्धेच्या जाळ्यात फक्त गरीब लाचार माणसंच नाही तर सरकारी अधिकारीही अडकले आहेत.

राज्यात जादूटोणा प्रतिबंधक कायदा येऊन आता 1 वर्ष लोटलं, पण अजूनही अनेक ठिकाणी बाबा-बुवांची दुकानं सुरूच आहेत. पुण्याच्या दौंड तालुक्यातल्या पिंपळगावात सध्या असाच प्रकार सुरू आहे. या गावात दर मंगळवारी आणि शुक्रवारी राज्याच्या कानाकोपर्‍यातून लोक येतात. ही गर्दी जमते ती नितीन थोरात महाराज नावाच्या बाबाकडून टोमॅटोचा ज्यूस पिण्यासाठी. हा टोमॅटो ज्यूस प्यायल्याने व्याधी बर्‍या होतात, अशी अंधश्रद्धा पसरवण्यात आली आहे.

पिंपळगावातल्या फिरंगाईमाता मंदिराजवळ या नितीन थोरात महाराजांचं ज्यूस वाटप गेल्या 3 वर्षांपासून सुरू आहे. हा ज्यूस मोफत वाटला जातो. मुख्य म्हणजे या बाबाकडे येणार्‍या भाविक मंडळींमध्ये सरकारी अधिकारी आणि राजकीय नेत्यांचाही समावेश आहे. या बाबाचं प्रस्थ इतकं वाढलंय की या परिसराला जत्रेचं स्वरूप येतं आहे. इथे फळा-फुलांची, भाजीची दुकानं थाटण्यात येतात. इथे वाढणार्‍या गर्दीमुळे ट्रॅफिक जॅमसारख्या समस्याही उद्भवत आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • kalpesh

    ibn lokmat la ekda paja nahitar kay darroj te kay pitat te sangayla nako….

close