राजस्थानची लढत कोलकाताशी तर चेन्नईची पंजाबशी

May 20, 2009 12:06 PM0 commentsViews: 2

20 मे, आयपीएलमध्ये आज दोन मॅच खेळवल्या जाणार आहेत. पहिली मॅच राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रंगणार आहे. कोलकाताने डेक्कनविरूद्धची मॅच जिंकत आपली पराभवाची मालिका खंडीत केलीय. त्यामुळे आजची मॅच जिंकून त्यांना पुन्हा एकदा विजयी कामगिरी करायची आहे. तर एकीकडे राजस्थान रॉयल्सला ही मॅच जिंकणं महत्त्वाचं आहे. सेमी फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित करण्यासाठी त्यांना ही मॅच जिंकावी लागणार आहे. दुसर्‍या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्जची लढत पंजाब किंग्ज एलेव्हनशी आहे. या मॅचमध्ये चेन्नईचं पारडं जड असलं तरी गेल्या तीनही मॅचमध्ये पंजाबने अटीतटीच्यावेळी विजय मिळवत प्रतिस्पर्ध्यांना आश्चर्यचकित केलंय. तसंच पंजाबलाही सेमी फायनलमध्ये आपलं स्थान पक्क करण्यासाठी ही मॅच जिंकावीच लागेल. या दोन्ही मॅचेस डर्बनला भारतीय वेळेनुसार दुपारी 4 आणि रात्री 8 वाजता खेळवण्यात येणार आहेत.

close