टीआरपीतही ‘हुतुतू’ !

September 16, 2014 7:19 PM0 commentsViews: 727

Pro Kabbadi Final Winners16 सप्टेंबर : मातीत खेळली जाणारी ‘हुतुतू’ अर्थात कबड्डी पहिल्यांदाच ग्लॅमरमय झाली आणि या पहिल्या वहिल्या प्रो कबड्डी लीगनं इतिहास रचलाय. टेलिव्हिजन रेटिंगमध्ये आयपीएलनंतर प्रो कबड्डी लीगनं विक्रमी दुसरं स्थान पटकावलंय. प्रो कबड्डी लीगला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. हा प्रतिसाद इतका होता की फिफा वर्ल्ड कप फायनल, विम्बल्डन फायनल आणि हॉकी इंडिया लीगपेक्षा ही संख्या जास्त ठरली आहे.

बॉलिवूडचा अभिनेता अभिषेक बच्चन याने पुढाकार घेऊन आयपीएलच्या धर्तीवर प्रो कबड्डी सुरू केली. या प्रो कबड्डीला प्रेक्षकांनी चांगलंच डोक्यावर घेतलंय. गावपातळीवर खेळली जाणारी कबड्डी पहिल्यांदाच टीव्हीच्या माध्यमातून घराघरात पोहचली. कबड्डी चाहत्यांचा तर प्रतिसाद मिळालाच पण तसाच प्रतिसाद हा टीव्हीवरसुद्धा बघायला मिळाला. 5 आठवड्यांत 8 शहरांत रंगलेल्या या स्पर्धेला तब्बल 435 दशलक्ष लोकांनी टीव्हीवर प्रतिसाद दिला. फिफा वर्ल्ड कप फायनल, विम्बल्डन फायनल आणि हॉकी इंडिया लीगपेक्षा ही संख्या जास्त ठरली आहे. तर फक्त आयपीएलचा टिआरपी प्रो कब्बड्डीपेक्षा जास्त ठरलाय. मुंबईत रंगलेली फायनल मॅच ही या स्पर्धेचं वैशिष्ठ्य ठरली. एका सर्व्हेनुसार भारतातील चारपैकी एका घरातील टीव्ही प्रेक्षकाने ही मॅच पाहिल्याचं समोर येतंय. या स्पर्धेला फक्त तरुणांचाच नाही तर मोठ्यांचाही मोठा प्रतिसाद मिळालाय. त्यामुळे क्रिकेटवेड्या भारतात कबड्डी सारख्या आपल्या मातीतल्या खेळाला चांगले दिवस येणार याचीच ही नांदी मानता येईल.
प्रो कबड्डीची बाजी

स्पर्धा                टीव्ही प्रेक्षकसंख्या

आयपीएल                       –   55 कोटी 20 लाख
प्रो कबड्डी लीग               –  43 कोटी 50 लाख
फिफा वर्ल्ड कप फायनल   –   2 कोटी 46 लाख
हॉकी इंडिया लीग             –    1 कोटी 4 लाख
विम्बल्डन पुरुष फायनल   –    61 लाख

 प्रो कबड्डीची कमाई

स्पर्धा                  टेलिव्हिजन रेटिंग
प्रो कबड्डी फायनल        8.64 कोटी
आयपीएल फायनल        20 कोटी
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close