‘टोमॅटो बाबा’वर कारवाई होणार?

September 16, 2014 7:33 PM4 commentsViews: 10202

pune tomato baba16 सप्टेंबर : एकीकडे ‘सर्वात पुढे महाराष्ट्र माझा’ असा टेंभा सरकार मिरवत आहे पण दुसरीकडे अजूनही राज्यात अंधश्रद्धेनं जखडलेली प्रकरणं समोर येत आहे. ‘टोमॅटो ज्यूस प्या बरं व्हा’ असं दुकान मांडलेल्या ‘टोमॅटो बाबा’ची आता चौकशी होणार आहे. यवत पोलिसांनी याबाबत कारवाई करणार असल्यांचं स्पष्ट केलंय.

पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातील पिंपळगाव येथे फिरंगाईमाता मंदिराजवळ टोमॅटो ज्यूस प्यायल्यानं व्याधी बर्‍या होतात, अशी अंधश्रद्धा पसरवणारा नितीन थोरात महाराज याचं 3 वर्षापासून हे दुकान सुरू आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालणार्‍या या बाबाकडून मिळणारा टोमॅटो ज्यूस पिण्यासाठी मोठी गर्दी या परिसरात होते.

नितीन महाराज देत असलेल्या टोमॅटो ज्यूसचे नमुने आणि औषध प्रशासनानं गोळा केले आहेत. अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकार्‍यांनी नितीन महाराज थोरात यांची भेट घेतली तेव्हा ते कोणती वनस्पती वापरतात त्याचं नावंही सांगू शकले नाहीत. औषध विबागाचा अहवाल यायचा असून अन्न विभागाच्या अहवालात टोमॅटो ज्यूस असल्याचं आढळून आलंय.

हा ज्यूस अमृत रस म्हणून वेगवेगळ्या व्यादींवर उपाय म्हणून मोफत वाटला जातोय असं या अधिकार्यांच्या निदर्शनास आलंय. हा प्रकार समोर आल्यानंतर पोलीस खातं खडबडून जागं झालंय. आता पोलीस या भोंदूबाबावर कारवाईसाठी वकीलांचा सल्ला घेत आहे. भोंदू बाबाच्या औषधी प्रकरणाची पोलीस चौकशी करणार आहेत. यवत पोलिसांनी याबाबत कारवाई करणार असल्याचं सांगितलंय. नवीन जादुटोणा कायद्यानुसार कारवाई करता येते का याबाबत वकिलांचा सल्ला घेण्यात येणार असल्याचंही पोलिसांनी सांगितलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • SWAPNIL

  YA GAVATLI DOCTRS CHE DHANDE BAND PADLE AHE AS SAMJALE …..BAHUDA HYANCHI BATMI MEDIA WALYANNA DOCTRANNI DILID ASAVI

  • amit sawant

   Maharaj ya media war abrunuksani cha dava taka amhi sagale tumchya pathishi aahot

 • Vijay

  Parisaratil Doctoranche dhande band padle tyamule tyanche he karasthan ahe. Doctoranni tambakhu, daru sodayala sangitali tar koni sodat nahi pan ya thikani sangitalyanantar lok sodtat ha ek changle karya ahe ase nahi watat . ani shevati he maharaj paise vagere kahich ghet nahit. tasech parisaratil shetkaryanna changli bajarpeth nirman zhali ahe. va tarunana rozgar. he disat nahi ka media walyanna. ( Media walyanna phakt swatachya potachich kalaji ahe yavarun disate)

 • anil

  agree with swapnil and vijay.. ha manus ek hi rupaya na gheta he sarv karto ani shivay ya mule kiti tatri likana rojgar hi milala.. ani to bolvat nahi lokna..ya mazykade mhnaun

close