नात्याला काळीमा, सख्या भावाकडूनच चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

September 16, 2014 10:53 PM0 commentsViews: 5127

rape16 सप्टेंबर : जळगावमध्ये आठ वर्षांच्या चिमुरडीवर सख्खा भाऊ आणि आतेभावानेच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील तांबापुरा भागात ही घटना घडली. सख्ख्या बहिणीवर अत्याचार करणारा हा मुलगा 16 वर्षाचा आहे. तर दुसरा आरोपी, चुलत आतेभाऊ हा 18 वर्षांचा आहे. याप्रकरणी या बालिकेचा भाऊ आणि चुलत आतेभावाविरुद्ध औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोघा संशयितांनी पीडित आठ वर्षाच्या या चिमुरडीला चॉकलेट व चप्पल घेऊन देण्याचे आमिष दाखवून 15 दिवसांपूर्वी आतेभावाच्या घरी आणि शिरसोली नाक्याजवळील पारख संकुल परिसरातील एका मोकळ्या जागी नेऊन अत्याचार केला होता. घडलेली घटना या पीडित मुलीने आपल्या वडिलांना सांगितली. तिच्या वडिलांनी सोमवारी दुपारी औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनला येत या प्रकाराबाबत फिर्याद दिली. पोलिसांनी या मुलीला जिल्हा सामान्य रुग्णालयात आणून वैद्यकीय तपासणी करून या प्रकरणी दोघांविरुद्ध भादंवि कलम 376 (2), (फ) (आय), 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक देवरे करीत आहेत. सख्ख्या बहिणीवर अत्याचार करणारा आरोपी 16 वर्षाचा आहे. तर दुसरा आरोपी चुलत आतेभाऊ हा 18 वर्षांचा आहे. दोघांना दारू आणि गांजा पिण्याचे व्यसन असल्याचे कळते शहरातील एका पाईप चोरीच्या गुन्ह्यात जिल्हापेठ पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close