लाखो मासे मृत

September 16, 2014 11:02 PM1 commentViews: 729

16 सप्टेंबर : रत्नागिरीमधल्या दाभोळ खाडीत लोटे मधल्या केमिकल ईंडस्ट्रीज मधून सोडण्यात आलेल्या केमिकलमुळे प्रचंड प्रमाणात मासे मेले आहेत. खाडीच्या दोन्ही किनार्‍यांवर मृत माशांचा खच पडला असून या परिसरात प्रचंड दुर्गंधी आणि प्रदूषण झालंय. इतकंच नाही तर या खाडीत मासेमारी करून रोजगार मिळवणार्‍या पारंपारिक मच्छीमारांचा रोजगारही बुडालाय. लोटे औद्योगिक वसाहतीतल्या केमिकल ईंडस्ट्रडीज मधून सोडण्यात येणार्‍या सांडपाण्यावर कोणतीहि प्रक्रीया न करता हे केमिकल गेली अनेक वर्षं दाभोळ खाडीत सोडण्यात येतंय. यावर
शेतकर्‍यांनी अनेक वेळा आंदोलनं केली. पण प्रदूषण नियंत्रण मंडळाने हे केमिकल थेट खाडीत सोडणार्‍या कंपन्यांवर अजून कोणतीही कारवाई केलेली नाही.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • ratnadeep rane

    आता कुते गेले जे गणपती बाप्पा चा नावाने त्यांचा कलर वरून जल परदुशण होत आणि त्याने पाण्याची आणि माश्यांची नासाडी होते म्हणणारे. त्याना आता नाही दिसत का ही दुरवस्ता ज़ालेली. आणि मेडिया वाले पण जे जोर जोरात बोंबा मारता ते का नाही ह्या विषयावर जास्ती बोलत. पाच दिवशांचा विसर्जन सोहळ्यामुळे ह्यांचा पाणी आणि किनारे ह्यांचे खराब होतात आणि वर्षाचे ३६० दिवस हे केमिकल प्लांट चालवणारे जे दिवसाला प्रदुषित पाणी नदी ,समुद्रा ह्या मधे सोडतात आणि दरवर्षी लाखो माशे मारतात आणि आमचे मॅचीमार जे बेरोजगार होतता तेव्हा कुते जाते ह्यांची पर्यावनवाची निष्ठा. जेव्हा आपण हे कमी करण्यात यशावी होऊ तेव्हाच खरयर्थाने आपण आपल्या पर्यावरणाचा संभाळ करू शकतो. नुसत कोणत्या तरी धर्माचा राग ठेऊन करत असला तर तेच खरे प्रयावरणाचे दोषी आहेत आणि घूणेगार सुद्धा.

close