‘लेट लतीफ’मुळे रहमान मलिकांच्या विरोधात विमानात नारेबाजी

September 16, 2014 11:35 PM0 commentsViews: 577

16 सप्टेंबर : पाकिस्तानी सिनेटर रहमान मलिक यांना आज चांगलंच जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागलंय. भर विमानात रेहमान मलिक ‘हाय हाय’ ची नारेबाजी झाली. याबद्दलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या क्लिपमध्ये पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स या फ्लाईटमध्ये संतापलेले प्रवासी पाकिस्तानी सिनेटर रहमान मलिक यांचा निषेध करताना दिसत आहेत. तसंच हे संतप्त प्रवासी केबिनमध्ये जाणार्‍या मलिकांना मागे फिरायला सांगतानाही या क्लीपमध्ये दिसतंय. रहमान मलिक यांच्यामुळे विमानाच्या उड्डाणाला उशीर झाला, असं या प्रवाशांचं म्हणणं आहे. पण यासाठी आपण जबाबदार नाही, असं मलिक यांनी रेहमान मलिक यांनी फ्लाईटच्या दिरंगाईसाठी आपण जवाबदार नसल्याचं ट्वीटरवरून स्पष्ट केलं.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close