अर्थमंत्र्यांसाठी नवीन अजेंडाही तयार

May 20, 2009 1:56 PM0 commentsViews: 4

20 मे, निवडणूकीच्या निकालानंतर अर्थमंत्री कोण होणार याकडे तर सगळ्यांच लक्ष लागलंच आहे. पण या अर्थमंत्र्यांसाठी नवीन अजेंडाही तयार करण्यात आलाय. त्यानुसार सिक्युरिटी ट्रॅन्झॅक्शन टॅक्समध्येही कपात होण्याची शक्यता आहे. अर्थमंत्रालयानं भावी अर्थमंत्र्याच्या कामकाजाची ब्लुप्रिंट्स तयार करुन ठेवली आहे. त्या ब्लुप्रिंटनुसार वस्तू आणि सेवा टॅक्स लागू करण्यात येईल. त्यामुळे राज्यांना सर्विस सेक्टरमध्ये टॅक्सवर अधिक सूट मिळण्याची शक्यता आहे. यात व्याजदर कमी होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे रिअल इस्टेट सेक्टरला फायदा होईल असं सांगण्यात येत आहे.

close