चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आजपासून भारत दौर्‍यावर

September 17, 2014 9:56 AM0 commentsViews: 375

Narendra Modi meets Xi Jinpingq

16 सप्टेंबर : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आज 3 दिवसांच्या भारत दौर्‍याची सुरुवात गुजरातमधून करणार आहेत. राजशिष्टाचार बाजूला ठेवून मोदी स्वत: अहमदाबाद विमानतळावर जिनपिंग यांचं स्वागत करणार आहेत.

भारत आणि चिन या दोन्ही देशांच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा समजला जात आहे. नरेंद्र मोदी कालपासूनच गुजरातमध्ये आहेत. आर्थिक सहकार्य हा दोन्ही देशांमधला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. तसंच नरेंद्र मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीनेही, ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जातं आहे.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना भारत दौरा

  • दु. 2:30 वाजता अहमदाबाद विमानतळावर आगमन
  • दु. 3:00 वाजता हॉटेल हयातला मोदी आणि शी जिनफिंग यांची भेट
  • दु. 4:30 करारांवर स्वाक्षर्‍या
  • संध्या. 5:08 साबरमती आश्रमाला भेट
  • संध्या. 5:35 साबरमती नदीवर फेरफटका, सांस्कृतिक कार्यक्रमांना चीनच्या अध्यक्षांची उपस्थिती
  • संध्या. 6:35 पंतप्रधान नरेंद्र मोदींतर्फे शाही खान्याचं आयोजन
  • संध्या. 7:30 जिनफिंग यांचे दिल्लीसाठी प्रयाण
  • रात्री 9:20 जिनफिंग यांचे दिल्लीत आगमन 
close