27 मेला राष्ट्रवादीची मुंबईत होणार महत्त्वाची बैठक

May 20, 2009 2:08 PM0 commentsViews: 1

20 मे, मुंबई लोकसभा निवडणुकीतील असामाधानकारक कामगिरी लक्षात घेऊन 27 मे 2009 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक मुंबईत होणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक होईल. राष्ट्रवादीचे सर्व मंत्री, जिल्हाप्रमुख आणि निरीक्षक या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीनंतर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राष्ट्रवादीच्या सर्व जिल्हा पदाधिकार्‍यांच्याही वेगळ्या बैठका घेतल्या जाणार आहेत आणि त्यानंतर लगेचच जून महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा पातळीवरील कार्यकारीणीत मोठे बदल केले जाण्याची शक्यता आहे.

close