मुंबईकर डेंग्यूमुळे हैराण

September 17, 2014 2:51 PM0 commentsViews: 327

17 सप्टेंबर : मुंबईमध्ये डेंग्यू आणि मलेरियाचं थैमान सुरु आहे. मुंबईमध्ये सध्या 28 ते 29 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आहे. या तापमानातही अनेक मुंबईकर जाड पांघरुणं, स्वेटर घातलेले दिसत आहेत. कारण, त्यांना तापाची हुडहुडी भरलीय आणि ही तापाची हुडहुडी डेंग्यूची असल्याचं आढळून आलं आहे. डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय स्वत: औषधं घेणं, उलट्या, डोकेदुखी याकडे दुर्लक्ष करणं यामुळे डेंग्यूच्या काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. शाळकरी मुलापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंतच्या डेंग्यूची बाधा झाल्याचं समोर आलं आहे.

तापाने फणफणलेल्या मुंबईकरांची महापालिकेने आकडेवारी दिलेली आहे पण याव्यतिरिक्त नोंदवल्या न गेलेल्याही अनेक केसेस आहेत.

मुंबईत डेंग्यूचा कहर

 • सप्टेंबरचे दोन आठवडे – 68 रुग्ण
 • ऑगस्ट – 65 रुग्ण
 • जुलै – 52 रुग्ण
 • जून – 27 रुग्ण

मुंबईत मलेरिया

 • मलेरियामुळे 7 महिन्यांत 9 मृत्यू
 • सप्टेंबरचे दोन आठवडे – 544 रुग्ण
 • ऑगस्ट – 1041 रुग्ण
 • जुलै – 827 रुग्ण
 • जून – 624 रुग्ण

मुंबईत लेप्टोस्पायरोसिस

 • सप्टेंबरच्या 2 आठवड्यात – 12 रुग्ण
 • ऑगस्ट – 22 रुग्ण
 • जुलै – 14 रुग्ण

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close