महायुतीत तणाव टोकाला, घटकपक्षांची धावधाव

September 17, 2014 6:06 PM0 commentsViews: 5178

raju shetty and ramdas athavale17 सप्टेंबर : जागावाटपावरून आता महायुतीत महाभारत सुरू झालं असून तणाव आता आणखी वाढलाय. दोन दिवसांत जागावाटपाचा निर्णय झाला नाही तर घटक पक्षांना वेगळा विचार करावा लागेल, असा इशाराच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टींनी दिलाय. भाजपला 135 जागा द्यायला सेनेचा अजूनही नकार आहे. सेना-भाजपमध्ये महाभारत सुरू असल्यानं घटकपक्षांची कोंडी झालीय.

निवडणुकीचे बिगुल वाजले असून महायुतीत जागावाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल झाले आहे. त्याअगोदर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि महायुती अभेद्य राहावी अशी विनंती केली. त्यानंतर राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांनी भाजपच्या नेत्यांचीही भेट घेतली. बैठकीत रामदास आठवले यांनी भाजपच्या नेत्यांची वाट पाहिली. पण हे नेते वेळेवर न आल्यानं नाराज झाले आणि आठवले बैठकीतून निघून गेले. महायुतीच्या घटकपक्षांचे नेते आता उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर जाणार आहेत. दुसरीकडे भाजपचे राष्ट्राध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल झालेत. युतीबाबत आज काही ठोस निर्णय होणार का, याकडे सगळ्या घटकपक्षांचं लक्ष लागलंय.

महायुतीचा जागावाटपाचा पर्याय कसा असेल?
– 121 जागा भाजप, शिवसेना 151
– रिपाइं 6 आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना 6
– महादेव जानकर 2 आणि विनायक मेटे 2
– मित्र पक्षांच्या जागेचा कोटा भरुन काढण्यासाठी मित्रपक्षांच्या उमेदवाराला संधी देणार

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close