इचलकरंजीमध्ये गुटखा कारखान्यावर छापा, दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

September 17, 2014 6:14 PM0 commentsViews: 573

ichalkarnji gutkha fact17 सप्टेंबर : राज्यात गुटख्यावर बंदी असतानाही कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजीमध्ये मात्र गुटखा कारखाना सुरूच असल्याचं उघड झालंय. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यासह भागात खळबळ उडाली आहे. अन्न औषध प्रशासनानं छापा टाकून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.

इचलकरंजीजवळच्या चंदूर रोडवर हा कारखाना सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानंतर पोलीस आणि अन्न औषध प्रशासनानं छापा टाकून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. शिवाय 4 वाहनंही जप्त करण्यात आलीत. या कारखान्यात गुटखा, पानमसाला आणि सुगंधी सुपारी तयार केली जात होती. या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांवर गुन्हा दाखल केलाय.. पण अजून अटक कोणालाही झालेली नाही. त्यामुळे संपूर्ण तयारीनिशी गुटख्याची निर्मिती करणारी साखळी अजून किती दिवस कार्यरत राहणार की प्रशासन त्यांच्यावर कडक कारवाई करणार अशा सवाल आता विचारला जातोय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close