काँग्रेस स्वबळावर लढायला सक्षम -मुख्यमंत्री

September 17, 2014 7:05 PM0 commentsViews: 948

cm on ncp 3317 सप्टेंबर : काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे स्वबळावर लढावं लागलं, तर काँग्रेसची तयारी आहे इतरांची आहे की नाही हे मला माहित नाही असा अप्रत्यक्ष इशारा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलाय. जागावाटपावर 2 ते 3 दिवसांत निर्णय होऊ शकतो असंही ते म्हणाले. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.

युतीचं जागावाटप होत नाही तोवर आघाडीची बोलणी लांबणीवर पडल्याचं समजतंय. राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रचाराचा धडका सुरू केलाय.
कालच कोल्हापुरात पहिली सभा झाली. गेल्या 2 दिवसांत जागावाटपाबद्दल राष्ट्रवादीनं कुठलंही मतप्रदर्शन केलं नसल्यानं आघाडीबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. निवडणुकीला महिनाभरापेक्षाही कमी वेळ राहिलेला आहे. असं असताना अजून काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीची घोषणा झालेली नाहीय. दरम्यान, काँग्रेसचीही सर्वच्या सर्व 288 जागांसाठी स्वबळावर लढण्याची चाचपणी सुरू आहे. हायकमांडकडून हिरवा कंदील मिळाल्याशिवाय आाघाडी नाही असंच चित्र दिसतंय. 19 तारखेला काँग्रेसची पहिली यादी जाहीर होणार असल्याची शक्यता आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी स्वबळावर तयारी सुरू असल्याचं सुचक वक्तव्य केलंय. राज्यभर स्वबळावर लढण्याची तयारी सुरू आहे. शेवटी आघाडी करून जरी लढला तरीे जिथे आमचे मतदारसंघ नाही. तिथे आघाडी करूनच लढावे लागेल. गेली 15 वर्ष 144 मतदारसंघामध्ये लढत आहोत तिथे स्वाभाविक आम्ही कमकुवत झालो असले तरी जागेचा आढावा घेणं सुरू आहे. महाराष्ट्रात सेक्युलर सरकार आणायचं असेल तर आम्हाला ताकदीने तिथे उभं राहावं लागेल असंही मुख्यमंत्री म्हणाले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close