निलेश राणे जिंकून येण्याचा करिष्मा म्हणजे मतपरिवर्तनच – नारायण राणे

May 20, 2009 2:43 PM0 commentsViews: 20

20 मे, रत्नागिरी रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातल्या सुरेश प्रभूंच्या पराभवाने शिवसेनेला जोरदार धक्का बसलाय. सिंधुदुर्गानंतर सेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणा-या रत्नागिरीतूनही निलेश राणेंना मताधिक्य कसं मिळालं, याचा शोध आता शिवसेनेचे नेते घेतायत. मतदारसंघ नवखा असूनही निलेश नारायण राणे वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी काँग्रेसचे खासदार झाले. करिष्मा होता अर्थातच नारायण राणे यांचा. पण उद्योग मंत्री नारायण राणे यांचं, सगळी मतं फिरवण्याचं काम कधी कुणाला शक्य नसतं. ती अशक्यप्राय गोष्ट आहे. ही मतं म्हणजे जिथे शिवसेनेचा खासदार होता तो काँग्रेसचा बनवण्याचं काम केलं आहे. हे मतपरिवर्तन आहे, ' असं मत पडलं. सुरेश प्रभूंना रत्नागिरी जिल्ह्यातून किमान चाळीस हजारांचं मताधिक्य देऊ असं सांगणा-या शिवसेना आणि भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रभूंना एका मताचंही मताधिक्य दिलेलं नाही. यावर शिवसेनेचे विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी, ' हा कदाचित गांधीजींचा चमत्कार असेल असं मला वाटतं. अनेक घरा घरांमध्ये गांधीजी पोचले असावेत अशा देखील काही माहिती येतायत काही बातम्या येतायत. मोठ्या प्रमाणात पैशाचं वाटप झालेलं आहे. पण तरीदेखील कोकण म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे कोकण हे समीकरण कालपर्यंत पाहायला मिळत होतं निश्चितपणे त्याला कुठेतरी ठेच मिळाली आहे, असं म्हणाले. एक काळ असा होता की मुंबईतून एखाद्या शिवसैनिकाने आवाजकुणाचा म्हटलं की कोकणातून शिवसेनेचा असं ऐकू यायचं . पण आता असा आवाज देणारं मुंबईतून कुणी पुढे येईल असं वाटत नाही. आलाच तर कोकणातून त्याला प्रतिसाद मिळेल अशी शक्यता नाही.नारायण राणेंकडे न गेलेली मुंबईतली कोकण बेस शिवसेना अगोदरच राज आणि उध्दव यांच्या भाऊबंदकीत विभागली गेली आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी पाठोपाठ रायगडही शिवसेनेच्या हातातून जायला वेळ लागणार नाही.

close