दिवाळी ‘बोनस’, डिझेलचे दर कमी होणार?

September 17, 2014 10:16 PM0 commentsViews: 2453

petrol price hike17 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकांआधी केंद्र सरकार सर्वसामान्यांना ‘बोनस’ देण्याची शक्यता आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ‘वाढता वाढे’ डिझेलचे दर कमी करण्याचा सरकारचा विचार आहे.

त्यासाठी पेट्रोलियम मंत्रालयाने कायदा मंत्रालयाचं मत मागवलंय. डिझेलचे दर प्रतिलिटर 40 ते 50 पैशांनी कमी करण्याबद्दल सरकार विचार करतंय. महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत.

त्याआधी, 15 ऑक्टोबरच्या आधी हे दर कमी करण्याबद्दल पेट्रोलियम मंत्रालयाने कायदा मंत्रालयाकडे विचारणा केलीय. त्याचबरोबर डिझेलचे दर 1 रुपयाने कमी करावेत, असं काही मंत्र्यांचं म्हणणं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close