‘सत्तापरिवर्तन हीच मुंडेंसाठी श्रद्धांजली’

September 17, 2014 10:49 PM0 commentsViews: 1632

pankaja munde and gopinath munde17 सप्टेंबर : सत्तापरिवर्तन हीच मुंडेसाहेबांसाठी श्रद्धांजली असल्याचं भावनिक आवाहन भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं. पाथर्डी आणि शेवगावमधल्या सभेमध्ये त्या बोलत होत्या.

पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाखाली निघालेल्या संघर्ष यात्रेचा उद्या समारोप होणार आहे. आज अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी आणि शेवगावमध्ये त्यांच्या सभा झाल्या.

पाथर्डीतल्या सभेला तब्बल पाच तास उशीर होऊनही पाथर्डीकरांनी पंकजा मुंडेंना प्रचंड प्रतिसाद दिला. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या जामखेडमधल्या चौंडी या ठिकाणी पंकजा मुंडेंच्या संघर्ष यात्रेचा समारोप होतोय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close