भारतीय दोन खेळाडूंविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

September 17, 2014 11:00 PM0 commentsViews: 500

manoj rana17 सप्टेंबर : लैंगिक अत्याचाराचा एका घटनेनं भारतीय क्रीडाजगताला हादरा बसलाय. एशियन गेम्ससाठी दक्षिण कोरियाला जाणार्‍या दोन खेळाडूंविरुद्ध एका मुलीनं लैंगिक अत्याचाराची तक्रार केलीये.

भारतीय जिमनॅस्ट चंदन पाठक आणि कोच मनोज राणा यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवली गेली आहे. ही तक्रार करणार्‍या मुलीने आरोप केलाय की, हे दोघे जिममध्ये असताना त्यांनी तिच्याकडे पाहून असभ्य हावभाव केले.

या दोघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. शरमेची बाब म्हणजे या दोघांचा एशियन गेम्ससाठी दक्षिण कोरियाला जाणार्‍या पथकामध्ये समावेश आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close