अखेर मनोज कुमारला अर्जुन पुरस्कार

September 17, 2014 9:07 PM0 commentsViews: 157

manoj kumar 3317 सप्टेंबर : अखेर बॉक्सर मनोज कुमारला 2014 वर्षाच्या अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. क्रीडा मंत्रालयाने मनोज कुमारचं नाव अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूंच्या यादीत घालण्यास होकार दिला आहे. पण या सन्मानासाठी मनोज कुमारला न्यायालयाचा दरवाजा ठोठावावा लागला होता.

29 ऑगस्टला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते 15 खेळाडूंना अर्जुन पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं होतं. पण या यादीत आपल्या नावाचा समावेश न केल्यानं मनोज कुमारनं न्यायालयात दाद मागितली होती. अखेर कोर्टाने क्रीडा मंत्रालयाला तसे निर्देश दिले आहेत.

2010 कॉमनवेल्थ गेम्समध्ये गोल्ड पटकावणार्‍या मनोज कुमारने आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाला अनेक मेड्लस मिळवून दिली आहेत. पण त्याच्या नावाचा विचार कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं केला नव्हता. पण अखेर आता क्रीडा मंत्रालयाने मनोज कुमारला फोनवरुन पुरस्काराची माहिती दिलीये. पण यासंदर्भातील अंतिम घोषणा ही एशियन गेम्सनंतर केली जाणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close