महाराष्ट्रात पाऊस वेळेवर : मॉन्सूनचे ढग थडकले अंदमानमध्ये

May 20, 2009 2:39 PM0 commentsViews: 1

20 मे, टीव्हीवरच्या टाल्कम पावडरच्या जाहिराती पाहून तुम्ही थकून गेला असाल, पंख्याखाली हाशहुश्श करत बसला असाल, तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. तुम्ही ज्याची वाट पाहत आहात, तो यंदा वेळेवर येणारेय. आता हो तो म्हणजे कोण? याचं उत्तर तुम्ही जाणलंच असेल, हा तो म्हणजेच पाऊस… लहान-थोरांसकट सगळ्यांचा आणि विशेष करून प्रेमी युगुलांचा आवडता असणारा हा पाऊस यंदा चक्क वेळेवर दाखल होतोय. सध्या तो अंदमानात आलाय. 1999 नंतर तब्बल 10 वर्षांनी तो प्रथमच 20 मे ला दाखल झालाय. केरळातही हा वरुणराजा वेळेच्या आधीच म्हणजे 26 तारखेला दाखल होईल असा वेधशाळेचा अंदाज आहे. पुणे वेधशाळेच्या संचालिका मेधा खोले यांनी आज ही माहिती दिली.

close