पंकजा मुंडे यांच्या ‘संघर्ष यात्रे’चं आज होणार समारोप

September 18, 2014 11:16 AM1 commentViews: 2157

Pankaja Munde

18 सप्टेंबर : भाजप आमदार पंकजा मुंडे यांच्या संघर्ष यात्रेचा आज गुरूवारी समारोप होणार आहे. अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मगावी म्हणजेच चौंडीमध्ये या यात्रेचा समारोप होईल. जिजाऊं मातेच्या जन्मस्था शिंदखेडराजापासून पंकजा यांनी संघर्ष यात्रेला सुरुवात केली होती. या यात्रेत त्यांनी 79 मतदारसंघात तब्बल तीन हजार किलोमीटरचा प्रवास केला. आता या यात्रेचा समारोप चौंडीत होत आहे.

यात्रेच्या समारोपाला भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासह भाजपमधले अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने भाजप शक्ती प्रदर्शन करणार आहे. तसंच अमित शहा पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन ही करणार आहेत. दरम्यान, पंकजा मुंडेंकडे जनता महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून बघतेय, अशी भावना काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Sandeep Raje

    पंकजा मुंडेंकडे जनता महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून बघतेय

close