महायुतीचं जागावाटप सन्मानपूर्वक व्हावं- अमित शहा

September 18, 2014 10:54 AM0 commentsViews: 2079

amit shah in kol

18 सप्टेंबर : जागावाटपाबाबत भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी एकमेकांचा सन्मान होईल असा तोडगा काढवा. आम्ही दोन पाऊल पुढे येतो, तुम्हीही दोन पाऊल पुढे या, असं आवाहन भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज (गुरूवारी) शिवसेनेला केलं. अमित शहा यांचं आज सकाळी कोल्हापुरात आगमन झालं, तेव्हा कार्यकर्त्यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं. विमानतळाजवळच त्यांनी छोटेखानी सभा घेतली. त्यावेळी येत्या काळात राज्याचं नेतृत्व कोणत्या पक्षाने आणि कोणत्या व्यक्तीने करावं हे राज्यातल्या जनतेला हे ठरवावं असं अमित शहा म्हणाले. महाराष्ट्रात भाजपच सत्तेवर येणार असा विश्वास अमित शहांनी व्यक्त केला.

अंबाबाईचा आशीर्वाद घेऊनच भाजपचा आज प्रचार सुरू झालाय, असंही शहांनी जाहीर केलं. महाराष्ट्र काँग्रेसमुक्त होईल, तेव्हाच मोदींचं काँग्रेसमुक्त भारताचं स्वप्न पूर्ण होईल असं ते म्हणाले. एक काळ असा होता जेव्हा देशाचं नेतृत्वन महाराष्ट्रतून होतं होतं, औद्योगिक विकास मोठ्याप्रमाणात होता, सहकार आंदोलनाला समजून घेण्यासाठी महाराष्ट्रात यावे लागत होते. पण, आता परिस्थिती वेगळी आहे, असं सांगत त्यांनी आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडला आहे. राजकारणाचं व्यापारीकरण शरद पवारांनी केलं अशी टीका अमित शहानी काँग्रेस राष्ट्रवादीवर केली आहे. तसचं सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांवर टीका करत ते म्हणाले, महाराष्ट्र सरकारने अनेक घोटाळे केले आहेत. त्या घोटाळ्यांच्या चौकशीचेही नाटक होते. या घोटाळ्यांच्या पार्श्वभूमिवर आमचं सरकार आलं तरी महाराष्ट्राला गतवैभव मिळवून देण कठीण झालं.

तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौर्‍यावर असलेले अमित शहा आज सकाळी कोल्हापूरमध्ये आले आहेत. अंबाबाईचे दर्शन घेऊन ते पुढे आमदार पंकजा मुंडे यांच्या संघर्ष यात्रेच्या समारोप कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नगर जिल्ह्यातील चौंडी इथे जाणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close