पंतप्रधान मोदी आणि जिनफिंग यांच्यात आज शिखर परिषद

September 18, 2014 11:50 AM0 commentsViews: 380

Modi with Jhimping

18 सप्टेंबर : चीनचे अध्यक्ष शी जिनफिंग यांच्या भारत दौर्‍याचा आज दुसरा दिवस आहे. शी जिनफिंग आणि पंतप्रधान मोदींची आज शिखर वार्ता होणार आहे. या परिषदेत अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षर्‍या होण्याची शक्यता आहे. ही शिखर परिषद दोन ते तीन तास चालेल अशी अपेक्षा आहे. काहीवेळा पूर्व परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीही जिनफिंग यांची भेट घेतली आहे.

भारत दौर्‍याचा जिनफिंग यांचा आजचा दुसरा दिवस असून सकाळी त्यांचं राष्ट्रपती भवनात स्वागत झालं. ‘भारताचा हा आपला पहिलाच दौरा आहे, दोन्ही देशांच्या मैत्रीला आमचं नेहमीच प्राधान्य राहीलंय, असं मत जिनफिंग यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. जिनफिंग यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली आहे. तर जिंगपिंग यांच्या पत्नी पेंग लियुयांग यांनी टागोर इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना भेट दिली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close