पालघरमध्ये 4 वनरक्षकांवर प्राणघातक हल्ला

September 18, 2014 9:53 AM0 commentsViews: 341

Palghar

18 सप्टेंबर : पालघरच्या वाडा तालुक्यातल्या कंचाड गावाजवळ असलेल्या जंगलात 4 वनरक्षकांवर प्राणघातक हल्ला झाला आहे. या जंगलातल्या साग, खैर अशा मौल्यवान झाडांची तस्करीसाठी राजरोसपणे  कत्तल सुरू आहे.

कंचाड गावाजवळ कोहोज किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात 4 वन रक्षक गस्त घालत होते. या वन रक्षकांना जंगलातली झाडं तोडली जात असल्याचं आढळून आलं होतं. तपास करण्यासाठी ते पुढे गेले तेव्हा अचानक त्यांच्यावर 30 ते 35 तस्करांनी दगडफेक केली. जीव वाचवण्यासाठी हे वनरक्षक तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला पण या तस्करांनी त्यांचा पाठलाग केला आणि त्यांच्यावर प्राणघातक वार केला आहे. अशा प्रकारहल्ल्यांचे या भागात वारंवार होत असल्याचंही इथल्या स्थनिकांनी सांगितलं आहे.

या हल्ल्यात चारही वनरक्षक जबर जखमी झाले असून त्यातल्या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या पायावर, छातीवर आणि डोक्यात जबर जखमा झाल्या आहेत. दरम्यान, अज्ञात 30 ते 35 तस्करांविरोधात वाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close