एस. टी. च्या ताफ्यात मसिर्डीजच्या चार बसेस दाखल

May 20, 2009 2:55 PM0 commentsViews: 5

20 मे, अमृता दुर्वेएस.टी. आणि मर्सिडीज…ही दोन नावं एकत्र येऊ शकतात का?…पण आता हे खरं आहे… लाल डब्याच्या एस.टी.च्या ताफ्यात मुंबईमध्ये 4 नव्या मर्सिडीज बसेस दाखल झाल्या आहेत. चकचकीत निळा रंग, आरामदायी सीट्स आणि भरपूर लेगरूम अशा थाटात एस.टी. च्या या 4 नव्या शानदार मर्सिडीज बस दिमाखात शिवनेरीच्या ताफ्यामध्ये दाखल झाल्या आहेत. आधीच्या बसेसपेक्षा या बसचा पिक – अप आणि सस्पेन्शन चांगलं असेल असं समजतंय. दादर – पुणे मार्गावर या बसेसच्या रोज फेर्‍या असतील आणि मुंबई- नाशिक मार्गाचं काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरही एस.टी. मसिर्डीज बसेस धावतील. 225 रुपयांच्या त्याच माफक दरात नवीन बसमध्ये प्रवास करायला मिळाल्याने प्रवासीही खुश आहेत.

close