मनसेचा ‘राम’ आता म्हणणार ‘जय श्रीराम’

September 18, 2014 8:30 PM0 commentsViews: 8260

ram kadam 33318 सप्टेंबर :निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ‘आयाराम गयाराम’ सुरू असताना आता भाजपच्या गळाला मनसेचे आमदार राम कदम लागले आहे. घाटकोपरचे मनसेचे आमदार राम कदम यांनी भाजपमध्ये दाखल झाले आहेत. पुण्यातल्या जाहीर सभेत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता मनसेचा ‘राम’ आता भाजपमध्ये श्रीराम म्हणणार असंच दिसतंय.

मनसेचे मुंबईतील घाटकोपरचे आमदार राम कदम आपल्या ‘बेधडक’ स्टाईलमुळे चांगलेच वादात राहिले. ‘मराठीत बोला’ असा पवित्रा घेत आमदारपदाच्या शपथविधी सोहळ्यात राम कदम यांनी समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांच्यावर हल्लाबोल केला होता. एवढेच नाहीतर मागील वर्षी पीएसआय सचिन सुर्यवंशी यांना मारहाण केल्या प्रकरणी राम कदम यांना जेलची हवा खावी लागली होती. मध्यंतरीही अनेक प्रकरणात राम कदम यांचं नाव झळकत राहिलं. त्यामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची नाराजी कदम यांनी ओढावून घेतली होती. त्यामुळे त्यांना पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमातून डावलण्यात येत होतं. राम कदम यांनी आपली नाराजी या अगोदरही बोलावून दाखवली होती. मध्यंतरी राम कदम भाजपच्या वाटेवर असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली होती. मात्र त्यावेळी कदम यांनी या बातमीचं खंडन केलं होतं. अखेर विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत गुपचूप राम कदम यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला. कदम यांचा भाजप प्रवेश मनसेला मोठा धक्का समजला जातोय. कारण मनसेकडे मोजून आता 10 च आमदार उरले आहे. पुण्याचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचं निधन झालं तर कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पक्षाला रामराम ठोकला. त्यामुळे मनसेच्या इंजिनमधून उतरून राम कदम यांनी ‘जय श्रीराम’चा नारा पुकारलाय. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close