जागावाटपाचा फैसला सोनियांच्या हाती?

September 18, 2014 5:28 PM0 commentsViews: 1024

soina gandhi and pawar18 सप्टेंबर : युतीचं जागावाटप रखडलं असताना आघाडीची अवस्थाही तीच आहे. राष्ट्रवादी 144 जागांवर ठाम आहे तर काँग्रेस तेवढ्या जागा द्यायला तयार नाही. दोन्ही पक्षांनी स्वबळाची भाषा सुरू केलीय. काँग्रेसने सर्व 288 जागांची चाचपणी करून उमेदवारांच्या नावांची यादी पक्षाध्यक्षा सोनिया गांधींकडे पाठवली आहे. सोनिया गांधी आज परदेशातून परतणार असून त्यानंतर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

युतीचं जागावाटप होत नाही तोवर आघाडीची बोलणी लांबणीवर पडल्याचं समजतंय. राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रचाराचा धडका सुरू केलाय.गेल्या 2 दिवसांत जागावाटपाबद्दल राष्ट्रवादीने कुठलंही मतप्रदर्शन केलं नसल्याने आघाडीबद्दल संभ्रम निर्माण झालाय. निवडणुकीला महिनाभरापेक्षाही कमी वेळ राहिलेला आहे. असं असताना अजून काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीची घोषणा झालेली नाहीय. दरम्यान, काँग्रेसचीही सर्वच्या सर्व 288 जागांसाठी स्वबळावर लढण्याची चाचपणी सुरू आहे. हायकमांडकडून हिरवा कंदील मिळाल्याशिवाय आाघाडी नाही असंच चित्र दिसतंय. त्यातच सोनिया गांधी परदेश दौर्‍यावर असल्यामुळे जागावाटपाचा तिढा त्यांच्या आल्यानंतरच सुटणार अशी शक्यता आहे. सोनिया गांधी दिल्लीत परतल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार त्यांची भेट घेणार आहे त्यानंतर हा तिढा सुटेल अशी आशा दोन्ही पक्षांकडून व्यक्त होतं आहे.

आघाडीच्या जागावाटपाचं घोडं कुठे अडलंय ?

पहिली बैठक
राष्ट्रवादीचा प्रस्ताव : 144 जागांची मागणी

दुसरी बैठक
काँग्रेसचा फॉर्म्युला
काँंग्रेस – 168 जागा
राष्ट्रवादी – 110 जागा

बैठका थांबल्या, चर्चा खोळंबली
दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची चर्चा
अहमद पटेल – प्रफुल्ल पटेल यांची चर्चा

काँग्रेसची तडजोड
128 पर्यंत जागा सोडायला तयार
राष्ट्रवादीची तडजोड
144 जागांचा आग्रह सोडला – 132 पर्यंत मागणी

आता लक्ष
सोनिया गांधी – शरद पवारांच्या भेटीकडे
आज – उद्या दिल्लीत भेट
जागांचा फॉर्म्युला निश्चित करणार

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close