मनसेने कंबर कसली विधानसभा निवडणुकांसाठी

May 20, 2009 2:59 PM0 commentsViews: 5

20 मे, मुंबईलोकसभेच्या निवडणूक निकालानंतर मनसेने आता विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी मनसेच्या पदाधिका-यांची बैठक राज ठाकरे यांनी बोलावली आहे. या बैठकीत मनसेला मिळालेल्या मतांचं विश्लेषण केलं जाणार आहे. त्याचबरोबर या बैठकीत शिवसेनेनं मनसेवर केलेल्या आरोपांना राज ठाकरे काय उत्तर देताहेत, याची उत्सुकता मनसे कार्यकर्त्याबरोबरच राजकीय पक्षांनाही आहे. मुंबईतल्या षण्मुखानंद हॉलमध्ये ही बैठक 22 तारखेला संध्याकाळी सहा वाजता होणार आहे.

close