बुलडाण्यात 66 लाखांची रोकड सापडली

September 18, 2014 4:57 PM0 commentsViews: 729

buldhana news18 सप्टेंबर : निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली तशी घोडेबाजारालाही ऊतू येऊ लागला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर इथं एका कारमध्ये 66 लाख 46 हजार 913 रुपये रोकड सापडलीय. आचारसंहिता लागू झाली आणि निवडणुकीच्या तोंडावर एवढी मोठी रक्कम सापडल्याने खळबळ उडालीय.या प्रकरणी आनंद मेश्राम, नितीन अल्पी, स्वप्नील जुमडे या तिघांना ताब्यात घेण्यात आलंय. हे सर्व नागपूर इथले आहेत. ही रक्कम निवडणुकीत वापरण्यासाठी आणण्यात आली का याचा तपास पोलीस करत आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close