काँग्रेसकडे काही तासांचाच अवधी शिल्लक -तटकरे

September 18, 2014 8:28 PM0 commentsViews: 1628

tatkare343418 सप्टेंबर : काँग्रेस राष्ट्रवादीच्या जागावाटपाचं गुर्‍हाळ थांबलं असतानाच राष्ट्रवादीने काँग्रेसला पुन्हा इशारा दिला आहे. 2 दिवसांचा अल्टिमेटम संपायला काही तासांचाच अवधी शिल्लक आहे असं स्पष्टीकरण प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलंय. तर काँग्रेसने स्वबळाची भूमिका घेतली तर राष्ट्रवादीचीही पूर्ण तयारी आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय.

मुंबईत आज राष्ट्रवादीची पत्रकार परिषद पार पडली यावेळी सुनिल तटकरे आणि अजित पवार यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला इशारा दिला. आमचा 144 जागांचा प्रस्ताव मान्य नसल्याचं काँग्रेसनं कळवलंय. पण तरीही सन्मानजनक आघाडी व्हावी या मताचे आम्ही आहोत, असंही अजित पवार म्हणालेत. 2004 प्रमाणं सर्वाधिक जागा आम्हाला मिळाल्या तर मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल असं अप्रत्यक्ष सांगताना अजित पवार यांनी 2004 ची चूक पुन्हा होणार नाही असंही त्यांनी जाहीर केलंय. त्यामुळे आघाडीत शहकाटशहाचं राजकारण चांगलंच रंगलंय हे स्पष्ट होतंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close