आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली वाय. एस. आर. रेड्डी यांनी

May 20, 2009 4:05 PM0 commentsViews: 5

20 मे, आंध्रप्रदेश आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ वाय.एस. राजशेखर रेड्डी यांनी घेतली आहे. वाय.एस.राजशेखर रेड्डी यांनी सलग दुसर्‍यांदा आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल एन. डी. तिवारी यांनी त्यांना पद आणि गोपनितेची शपथ दिली. हैदराबादमधल्या लालबहादूर शास्त्री स्टेडियमवर शपथविधी समारंभ पार पडला. या समारंभाला लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. आंध्रप्रदेश विधानसभेतल्या 294 जागांपैकी काँग्रेसने तब्बल 156 जागा जिंकल्या आहेत.

close