आमच्या काही जागा घ्या पण तिढा सोडवा -शेट्टी

September 18, 2014 10:51 PM1 commentViews: 2010

Image raju_sheti_300x255.jpg18 सप्टेंबर : आमच्या काही जागा घ्या पण जागावाटपाचा तिढा सोडवा अशी विनंती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केलीये. तसंच 2 दिवसांत जागावाटपाचा तिढा सोडवा अन्यथा वेगळा विचार करावा लागेल असा इशाराही शेट्टींनी दिला. ते पुण्यात बोलत होते.

महायुतीत जागावाटपाचा तिढा सुटत नसल्यामुळे घटकपक्ष अस्वस्थ झाले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी आज दोन वेळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

त्यानंतर पुण्यात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. 12 पैकी 10 मतदारासंघात आम्ही मताधिक्य घेतले होते आणि मागच्या विधानसभेत एक आमचा आमदार होता हा हिशेब करता किमान 12 ते 13 जागा मिळाव्यात अशी मागणी शेट्टी यांनी केली.

तसंच जर युतीत जागावाटपाचा तिढा सुटत नसेल तर आमच्या काही जागा घ्या असंही शेट्टी म्हणाले. तसंच कुणाला किती जागा यापेक्षा महायुती महत्त्वाची आहे जर काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर करण्यासाठी महायुती होणं गरजेचं आहे असंही शेट्टी म्हणाले.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • rahul

    swabhimanachi bhasha?

close