भारत-चीनमध्ये नव्या पर्वाला सुरूवात

September 18, 2014 11:44 PM0 commentsViews: 579

Modi with Jhimping_meeting18 सप्टेंबर : भारत आणि चीनमध्ये आज नव्या पर्वाला सुरूवात झाली आहे. दोन्ही देशांनी परस्परांबद्दल विश्वास वाढवला तर सर्वच प्रश्नांवर तोडगा निघु शकतो असं स्पष्ट केल्यानं, भारत आणि चीन मधल्या व्यापार आणि राजकीय संबंधांना नवं वळण मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय.

अहमदाबादचा पाहुणचार घेतल्यानंतर चीनचे अध्यक्ष दिल्लीत आले आणि खर्‍या हार्ड डिप्लोमसीला सुरूवात झाली. दोन्ही देशांमध्ये
झालेल्या शिखर परिषदेत पहिल्यांदाच अत्यंत महत्वाच्या सीमा प्रश्नावर चर्चा झाली आणि खुल्या दिलाने चर्चा करून मार्ग काढण्याचं दोघांनीही मान्य केलंय.

भारत आणि चीनमधला सीमा प्रश्न ऐतिहासिक आहे. परस्पर विश्वास आणि सामज्यंसानंच तो सोडवावा असं मत शी जीनफिंग यांनी व्यक्त केलं. भारत आणि चीनमध्ये 12 महत्वाचे करार करण्यात आलेत.

भारत-चीन महत्त्वाचे करार

  • - चीन पाच वर्षात 20 बिलीयन डॉलर्सची गुंतवणूक करणार
  • - रेल्वेच्या विकासात सहयोग
  • - कैलास मानस सरोवर यात्रेसाठी नाथुला खिंडीतून नवा मार्ग
  • - सास्कृतीक देवाघेवाण वाढवण्यासाठी विशेष गट
  • - 2015 हे व्हिजिट इंडिया तर 2016 हे व्हिजिट चायना वर्ष

गेल्या सहा दशकांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्वागत झालेले जीनफिंग हे पहिलेच नेते आहेत. गेल्या 50 वर्षात दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये बरचं पाणी वाहून गेलंय. चीनमध्ये जीनफिंग हे कणखर आणि लोकप्रिय नेते म्हणून ओळखले जातात तर भारतात नरेंद्र मोदींनाही प्रचंड बहुमत आणि लोकप्रियता आहे. त्यामुळे चीनचीही भाषा बदललीय. भारतात 1962 च्या कटू आठवणी अजूनही कायम आहेत. मात्र बदलती जागतिक परिस्थितीत दोन्ही देशांना इतिहासाचं ओझं टाकून पुढं जावं लागेल असं तज्ञांचं मत आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close