पुण्याच्या कृष्णा पाटीलने केलं एव्हरेस्ट सर

May 21, 2009 6:50 AM0 commentsViews: 1

21 मे अनेक खडतर आव्हानं पार करत एव्हरेस्टवर पडलं आणखी एक मराठी पाऊल…पुण्याच्या कृष्णा पाटील या अवघ्या 19 वर्षांच्या मराठमोळ्या धाडसी मुलीनं एव्हरेस्ट शिखर सर केलय. आज गुरूवारी सकाळी 7 वाजता तिने एशियन ट्रेकिंग ग्रुपच्या सदस्यांबरोबर एव्हरेस्टवर पाऊल ठेवलं. नेपाळ सरकारने तिच्या या पराक्रमावर शिक्कामोर्तब केलंय. काल बुधवारी रात्री 9 वाजता कृष्णाने एव्हरेस्टच्या शेवटच्या टप्प्याच्या चढाईला सुरूवात केली आणि आज गुरूवारी सकाळी 7 वाजता शिखरावर पाऊल ठेवलं. उत्तर काशीमधल्या नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंन्टेनिअरिंगमध्ये प्रशिक्षण घेऊन त्यानंतर एशियन ट्रेकिंग ग्रुपतर्फे कृष्णाने हा विक्रम साधलाय. त्याबद्दल तिचं सगळीकडून अभिनंदन होतंय.

close