17व्या एशियन गेम्सचं आज होणार उद्घाटन

September 19, 2014 8:32 AM0 commentsViews: 269

Asian Ganes 2014
19 सप्टेंबर :  दक्षिण कोरियाच्या इंचिऑनमध्ये 17व्या एशियन गेम्सना आज सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा रंगारंग उद्घाटन सोहळाने या स्पर्धेची सुरूवात होणार आहे. पुढचे 15 दिवस चालणार्‍या या स्पर्धेत आशियातील 45 देशांतील 13 हजार ऍथलीट्स 36 गेम्समध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे पुढचे काही दिवस आशियाई देशातल्या क्रीडा क्षेत्रातले खेळाडू वर्चस्वासाठी एकमेकांना भिडतील.

भारतीय खेळाडू 28 क्रीडा प्रकारांत सहभागी होतील त्यामध्ये भारताचे 515 खेळाडू भाग घेतील. 2010 मध्ये गुआँग्झाओला झालेल्या एशियन गेम्सवर चीनने वर्चस्व गाजवलं होतं तर भारताची कामगिरीही समाधानकारक झाली होती. गेल्या एशियन गेम्समध्ये भारतानं 14 गोल्ड, 17 सिल्व्हर आणि 34 ब्राँझ मेडल्ससह एकून 65 मेडल्स पटकावले होते. त्यामुळे वेळीही भारतीय खेळाडू आपली कामगिरी उंचावण्याचा नक्कीच प्रयत्न करतील.

शूटिंग, बॉक्सिंग, कुस्ती, बॅडमिंटन आणि तिरंदाजी या खेळांकडून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताला मेडल्सच्या सर्वाधिक आशा असतात पण यावेळी ऍथलेटिक्स, जिमनॅस्टिक, वेटलिफ्टिंग, ज्युडो, टेबल टेनिस या खेळांकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. नुकत्याच पार पडलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली होती. यावेळीही तशाच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी आता भारतीय टीम सज्ज झाली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close