चीनच्या फर्स्ट लेडी फेंग ली युआन आणि भारत!

September 19, 2014 11:18 AM0 commentsViews: 479

19 सप्टेंबर :  चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भारत दौर्‍यात त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी फेंग ली युआन याही आल्या आहेत. या दौर्‍याच्या प्रत्येक गोष्टींवर बारकाईनं लक्ष ठेवणार्‍या मीडियाचं चीनच्या फर्स्ट लेडीकडेही लक्ष आहे.

गुजराती गाण्यांवर ठेका धरणार्‍या फेंग ली युआन. सुरेख व्यक्तिमत्त्वानं पहिल्याच भेटीत लक्ष वेधून घेणार्‍या. त्यांची कारकीर्दही तितकीच इंटरेस्टिंग आहे. त्या चीनच्या जगप्रसिद्ध लाल सेनेच्या आर्ट ऍकॅडमीच्या डीन आहेत. लष्करात मेजर जनरल पदापर्यंत पोहोचणार्‍या त्या सर्वात तरुण व्यक्ती आहेत.

फेंग ली युआन या शब्दाचा चीनी भाषेतला अर्थ होतो सुंदर आणि ग्रेसफुल स्त्री. त्या चीनमधल्या सुप्रसिद्ध ऑपेरा डान्सर आहे. त्यांच्या पीपल फ्रॉम अवर व्हिलेज आणि ऑन द प्लेन्स ऑफ होप हे अल्बम खूप गाजले. त्यांची देशभक्तीवर गाणी आजही लोकप्रिय आहेत.

युआनच्या आई कला पथकात काम करायच्या तर वडील संग्रहालयाचे क्युरेटर होते. उत्तम आवाज असल्यामुळे युआनला वयाच्या 15 व्या वर्षीच स्थानिक आर्ट स्कूलमध्ये प्रवेश मिळाला. त्यानंतर लष्करात भरती, बीजिंग संगीत स्कूलमध्ये शिक्षण, असा त्यांचा प्रवास सुरू झाला. 1983 मध्ये वयाच्या 21व्या वर्षी त्या सुपरस्टारपदाला पोहोचल्या होत्या.

1987मध्ये त्यांचा शी जिनफिंग यांच्याशी विवाह झाला, त्यावेळी युआन त्यांच्यापेक्षा जास्त लोकप्रिय होत्या. नंतर शी जिनफिंग यांची राजकीय कारकीर्द बहरू लागली, तसं फेंग ली युआन यांचं गाणं कमी झालं. पण सार्वजिक जीवनाशी नाळ मात्र त्यांनी तुटू दिली नाही. चीनच्या फर्स्ट लेडी म्हणून एड्स आणि धूम्रपानविरोधी मोहिमेच्या त्या दूत आहेत. त्यांच्या कामाची दखल सातत्यानं जगभरात घेतली जाते.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close