लोकसभा अध्यक्षपदासाठी सुशीलकुमार शिंदेंचं नाव आघाडीवर

May 21, 2009 7:28 AM0 commentsViews: 1

21 मे, लोकसभा अध्यक्षपदासाठी सुशीलकुमार शिंदे यांचं नाव आघाडीवर आहे. किशोरचंद्र देव आणि वीरप्पा मोईलींची नावंही चर्चेत आहेत. एका बाजूला मंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू आहे तर दुसरीकडे लोकसभा अध्यक्षपद कोणाकडे जाणार याची उत्सुकता आहे. सोमनाथजींनंतर आता कोण लोकसभा अध्यक्ष होणार यासाठी तीन नावांची चर्चा आहे. पहिलं नाव आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे तर काँग्रेसचे नेते किशोरचंद्र देव हे दुसरं नाव आहे आणि वीरप्पा मोईली ज्यांना नुकतंच नीतिश कुमारांवर टीका करण्याच्या प्रकरणात काँग्रेसच्या मीडिया प्रवक्ते पदावरून हटवण्यात आलं होतं आता त्यांचंही नाव लोकसभा अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे.

close