सीकेपी बँक निर्बंधांमुळे ठेवीदारांच्या खिशाला कात्री

September 19, 2014 4:00 PM0 commentsViews: 338

ckp bank news19 सप्टेंबर : सीकेपी बँक निर्बंधांमुळे ठेवीदार चांगलेच चिंतेत सापडले आहे. ज्येष्ठ नागरिक खातेदारांना याचा जास्त त्रास होतोय. प्रशासक नेमलेल्या सीकेपी सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेनं आणलेल्या निर्बंधांमुळे ठेवीदारांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

रिझर्व्ह बँकेच्या आदेशामुळे खातेदारांना सहा महिन्यात फक्त एक हजार रुपयेच काढता येणार आहेत. त्यामुळे खातेदारांचे लाखो रूपये अडकून पडले आहेत.

रिझर्व्ह बँकेने बँकिंग कायद्याच्या कलम ’35-अ’नुसार सीकेपी बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध आणत खातेदारांना एकावेळी फक्त एक हजार रुपयेच बँकेत काढण्याची परवानगी दिली आहे आणि ते पण सहा महिन्यात.

यामुळे गोराई येथील ज्येष्ठ नागरिक खातेदारांना या वयात दिवसं – दिवस बँकेत चक्करा माराव्या लागत आहे. अखेर कंटाळून आज ज्येष्ठ नागरिकांनी बँकेजवळ मीटिंग घेतली आणि उपोषणाला बसण्याचा इशारा दिलाय. बँकेतील अधिकारी आणि काही आरबीआयचे अधिकार्‍यांच्या संगमतीने हा सर्व गोंधळ चालू आहे असा आरोप खातेदारांनी केलाय. मात्र अनेकांच्या ठेवी या बँकेत असून त्यावरील व्याजावर निवृत्तीधारक महिन्याचा खर्च भागवत आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close