भिशीच्या नावाखाली महिलेनं घातला पावणेदोन कोटींचा गंडा

September 19, 2014 8:50 PM0 commentsViews: 4373

19 सप्टेंबर : मुंबईतील डोंबिवलीमध्ये एका महिलेनं भिशीच्या नावाखाली गोर-गरिबांना तब्बल पावणेदोन कोटींचा गंडा घातल्याची घटना घडलीये. धुणं-भांडी करणार्‍या, मुलं सांभाळण्याचे काम करून हातावर पोट भरणार्‍या तब्बल 300 महिलांना प्रतिभा गोसावी या डोंबिवलीच्या महिलेनं गंडा घातलाय. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी प्रतिभा प्रकाश गोसावी या महिलेला अटक केलीये. तसंच, पोलिसांनी प्रतिभा गोसावीसह 7 जणांना अटक केली आहे.

‘अमुक-तमुक रूपये गुंतवा आणि लाखो रुपये मिळवा” अशा गुंतवणूक योजनांना अनेक जण बळी पडतात आणि त्यांच्यावर पश्चातापाची वेळ येते. डोंबिवलीमध्ये अशाच प्रकारे एका महिलेनं गरिबांना तब्बल पावणेदोन कोटींचा गंडा घातलाय. धुणं-भांडी करणार्‍या, मुलं सांभाळण्याचे काम करुन हातावर पोट भरणार्‍या तब्बल 300 महिलांना प्रतिभा गोसावीनं गंडा घातलाय. मानपाडा पोलिसांनी प्रतिभा प्रकाश गोसावी या ठग महिलेला अटक केली आहे. प्रतिभा गोसावीनं गरीब महिलांचा विश्वास संपादन केला होता. तुम्हांला मी चाळीतून टॉवरमध्ये राहायला जाण्याइतकं श्रीमंत बनवते असं म्हणून त्यांना भुलवलं होतं. सुरुवातीला या महिलेनं योग्य व्यवहार करुन त्यांचा विश्वास संपादन केला पण नंतर या महिलांना फसवून त्यांना तब्बल पावणेदोन कोटींचा गंडा घातला. दरम्यान पोलिसांनी प्रतिभा गोसावीसह 7 जणांना अटक केली आहे आणि अशा आमिषांना न फसण्याचं आवाहन केलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close