जेलमधून कैदी प्रेयसीसोबत पळाला पण…

September 19, 2014 11:43 PM0 commentsViews: 5818

prisoners nagpur19 सप्टेंबर : ‘प्रेम आंधळं असतं’ असं म्हणतात पण खुनाच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी नागपूरच्या सेंट्रल जेलमधून आपल्या प्रेयसीसोबत पळाल्यामुळे खळबळ उडाली आहे. सूरज अरकेल असं या कैद्याचं नाव आहे. जेलमधून तो आपल्या प्रेयसीसोबत नेहमी बोलत असे आणि पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो प्रेयसीसोबत पळून गेला. पण त्याला मलकापूरजवळ अटक करण्यात आली

गेल्या 16 वर्षापासून सूरज अरकेल हा खूनाच्या गुन्हामध्ये जन्मठेपेची शिक्षा नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये भोगत आहे. कारागृहात त्यांच्या जवळ मोबाईल फोन असल्याने इतर कैदी त्याच्या फोनवरून घरी फोन लावायचे. फेब्रुवारी महिन्यात एका तरुणाला लुटमारीच्या गुन्हात शिक्षा भोगण्यासाठी सेंट्रल जेलमध्ये पाठवण्यात आले. या युवकाची सुरज सोबत ओळख झाली आणि तो आपल्या बहिणीसोबत कारागृहातून फोनवर बोलत असे. यातूनच सुरजचे त्या युवकाच्या अल्पवयीन बहिणीशी प्रेमसंबंध जुळले. त्यामुळे बुधवारी सुरजने कारागृहातून पलायन करून अल्पवयीन मुलीला घेवून फरार झाला. या घटनेमुळे नागपूरच्या जेलमध्ये कारभार किती असुरक्षित आहे याचा प्रत्यय येतो. यापुर्वीही नागपूर सेंट्रल जेलमध्ये मोबाईल सापडल्याच सिद्ध झालं होतं. त्यामुळे या घटनेमुळे पुन्हा एकदा जेलच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close