सिंचन घोटाळ्या प्रकरणी पवार-तटकरेंची होणार चौकशी?

September 20, 2014 1:39 PM0 commentsViews: 1686

ajit pawar and sunil tatkare20 सप्टेंबर : ऐन निवडणुकीच्या धामधुमीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसलाय. सिंचन घोटाळ्याची अँटीकरप्शन ब्युरोमार्फत चौकशी होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या अडचणीत आणखी भर पडलीये.

11 सप्टेंबरला गृहविभागाने फाईल क्लिअर केल्यानंतर आज चौकशीसाठी परवानगी दिली. मुख्य सचिवांकडून ही फाईल आता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सादर करण्यात आली आहे. अजित पवार, सुनील तटकरे आणि इतर लोकप्रतिनिधींच्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांची मंजुरी आवश्यक आहे. या घोटाळ्याचा फौजदारी तपास होणार असल्याचंही समजतंय. तर याबद्दल मला काहीही माहित नाही, आचारसंहिता सुरू आहे आणि त्यामुळे मी काही बोलणं योग्य ठरणार नाही, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिलीय. पण याप्रकारचे कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत, असा दावा गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी केलाय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close